मंत्री प्राजक्त तनपुरे यांची मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याची सूचना

राजेंद्र सावंत
Saturday, 5 September 2020

मढीच्या तलावात मुळाचारीचे पाणी सोडले पाहीजे. वांबोरी चारीचे पाणी सुटणार आहे. मढी येथील तलाव भरुन नंतरच इतरत्र पाणी दिले जाईल.

पाथर्डी (अहमदनगर) : मढीच्या तलावात मुळाचारीचे पाणी सोडले पाहीजे. वांबोरी चारीचे पाणी सुटणार आहे. मढी येथील तलाव भरुन नंतरच इतरत्र पाणी दिले जाईल. मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दक्ष असावे, अशी सूचना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. 

मढी येथे तलावात वांबोरी चारीचे पाणी यावे व पाईपलाईन दुरुस्त करण्याची मढी ग्रामस्थांची मागणी होती. मंत्री तनपुरे यांनी शुक्रवारी मढी गावाला भेट दिली. तलावात उतरुन माहीती घेतली.

यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्य शिवशंकर राजळे, बाबासाहेब भिटे, ममुळा पाटबंधारेच्या प्रभारी कार्यकारी अभियंता सायली पाटील, भाऊसाहेब लवांडे, भगवान मरकड, चंद्रकांत मरकड, सचिन मरकड, संदीप राजळे, विष्णू मरकड, इलियास शेख, दादासाहेब मरकड व मढी ग्रामस्थ उपस्थीत होते. त्यानंतर मुळा पांटबधारेच्या प्रभारी कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना सांगितले की, योजनेची पाईपलाईन जिथं फुटलेली असेल किंवा नादुरुस्त असेल ती तातडीने दुरुस्ती करा. 

तनपुरे यांच्याकडे मढी ग्रामस्थांनी तलाव दुरुस्तीची मागणी केली. मढी येथील कानिफनाथांचे मंदिर संध्या बंद असल्याने प्राजक्त तनपुरे यांनी कानिफनाथ गडांच्या पायरीचे दर्शन घेतले. कानिफनाथांच्या पवित्र भुमीत मला कामाची संधी मिळाली हे माझे भाग्य असल्य़ाचे तनपुरे यावेळी म्हणाले. 
 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Prajakt Tanpure instructs the officials of the radish irrigation department to be vigilant