'आशा' सेविकांच्या पाठीवर मंत्री शंकरराव गडाखांची कौतुकाची थाप.!

asha sevika news
asha sevika news

नेवासे (नगर) : मनापासून केलेल्या कोणत्याही कामाचे कौतुक झाले आणि त्याबद्दल शाबासकी मिळाली किंवा त्या कामाची दखल कोणीतरी घेतली तर नक्कीच केलेल्या कामाबद्दल समाधान वाटते. तसेच त्यावेळी स्फूर्ती, उत्साह येतो. असाच काही सुखद व उत्साह देणारा अनुभव राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी साधलेले संवाद व कामाचे केलेले कौतुकाने भारावून गेलेल्या 'आशा' सेविकांना आला.  

सध्या कोरोना संकटात जीवाची बाजी लावून घरोघरी सर्व्हेक्षण करणाऱ्या व एरवी माता मृत्यू आणि बाल मृत्यूना आळा घालणाऱ्या, उन्ह-वारा अन् पावसाची तमा न बाळगता सर्वत्र घरोघरी पायी फिरून गरोदर मातांची काळजी घेणाऱ्या आशा स्वयंसेविका म्हणजे गुलाबी साडीतील 'देवदूतच'आहे. गावपातळीवर आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य सेविका (आशा) यांची गावागावात नेमणूक केली. या आशा सेविका म्हणजे गावच्या चालता बोलता सरकारी दवाखानाच असतात.  
 
नेवासे तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' ही मोहिम आशा सेविका गावागावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत उत्कृष्टपणे राबवत आहे. तसेच कोरोना पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे देखील तालुक्याचा दौरा करून गावोगावी जनतेशी संवाद साधत आहेत.         

मंत्री गडाख हे म्हाळस पिंपळगाव (ता. नेवासे) दौऱ्यावर असतांना त्यांना गावात कोरोना सर्व्हेक्षणाचे काम करणाऱ्या दोन आशा सेविका दिसल्या. गडाख यांनी चालकास गाडी थांबवायला सांगितली आणि मंत्री असूनही त्या दोन्ही आशा सेविकांना आपल्याकडे न बोलविता ते स्वतः त्यांच्याकडे काही अंतर चालत गेले. राज्याचा एक मंत्री आपल्याकडे येत आहे हे पाहून या दोन्हीही सेविका काही काळ गोंधळल्या. मात्र मंत्री गडाख व त्यांच्या परिवारांच्या साधेपणाशी परिचित असल्याने त्यांनी स्वतःला सावरले.
 
यावेळी मंत्री शंकरराव गडाख यांनी या सेविकांना सर्वप्रथम कोरोना पार्श्वभूमीवर स्वतःची आणि परिवाराची काळजी घेण्याचा सल्ला देत, आडी-अडचणींची आस्थेने विचारपूस करून कामकाजाची माहिती घेतली. 'आशा'चें या महामारीच्या काळात व एरवीही जनतेसाठी देत असलेले योगदान मोठे व कौतुकास्पद असल्याचे मंत्री गडाख यावेळी म्हणाले. दौऱ्याच्या व्यसत्तेत असतांनाही मंत्री गडाख यांनी तब्बल पंधरा-वीस मिनीटे साधलेला संवाद व कामाचे केलेले कौतुकाने आशा हरकून गेल्या होत्या.

नेवासे तालुक्यातील म्हाळस पिंपळगावातील आशा सेविका सुनीता पवार म्हणाल्या, महिला बचत गटाच्या महिला, अंगणवाडी सेविका किंवा आशा सेविका यासर्वांचेच मंत्री गडाख हे पाठीराखे असल्याचे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे. भेट झाल्यावर त्यांनी सर्व'आशा'च्या कामाचे केलेले कौतुक व अस्थेने केलेली विचारपूस आम्हाला आधार देणारी आहे. हा आधार आमच्या 'आशा'साठी खूप मोलाचा आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com