esakal | मंत्री तनपुरेंचा दुर्गम भागात जंगलातील अरुंद वाटेवर अंधारात दुचाकीवरुन प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Tanpur travels by bike on a narrow forest road in remote areas

दूर्गम, डोंगराळ, वन खात्याच्या जंगलातील आदिवासी पाडा बोंबलदरा, राहुरी- संगमनेर सीमेवर, दुरवर जंगलात वसलेल्या या आदिवासी वस्तीवर दुर्दैवाने अद्याप वीज पोहोचली नव्हती.

मंत्री तनपुरेंचा दुर्गम भागात जंगलातील अरुंद वाटेवर अंधारात दुचाकीवरुन प्रवास

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : तालुक्याच्या पश्चिमेकडील दूर्गम, डोंगराळ, वन खात्याच्या जंगलातील आदिवासी पाडा बोंबलदरा, राहुरी- संगमनेर सीमेवर, दुरवर जंगलात वसलेल्या या आदिवासी वस्तीवर दुर्दैवाने अद्याप वीज पोहोचली नव्हती.

काल (रविवारी) रात्री साडेआठ वाजता ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नवीन विद्युत रोहित्राचे उद्घाटन करून, आदिवासी बांधवांच्या अंध: कारमय जीवनात खऱ्या अर्थाने प्रकाश पोहोचविला.

चिखलठाणपासून पाच किलोमीटर अंतरावर दुचाकीवरून, दुर्गम जंगलातील अरुंद वाटेवरून प्रवास करून ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना बोंबलदरा गाठले. त्यांच्यासमवेत महावितरणचे सहाय्यक अभियंता मुथ्थुकुमार स्वामी, विनोद काळनर, इसाक सय्यद, आबा काळनर, अशोक डोमाळे, विजय डोमाळे उपस्थित होते. 

लाभार्थी आदिवासी झुंबर केदार, चिमाजी केदार, सखाराम केदार, मंजाबापू केदार, भाऊ केदार, बाळू केदार यांनी स्वागत केले. बोंबलदरा येथे पिढ्यानपिढ्या आदिवासी बांधव वनखात्याच्या जमिनी कसून, उदरनिर्वाह करतात. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाठपुरावा करून, कसत असलेल्या वन विभागाच्या जमिनी एक महिन्यापूर्वी आदिवासी बांधवांच्या नावावर करून दिल्या. तेथे महिनाभरात वीज पोहोचवून, पिढ्यानपिढ्या अंधारात चाचपडत असलेल्या आदिवासी बांधवांचे जीवन प्रकाशमय केले.

मंत्री झाल्यापासून बरीच उद्घाटनं केली. मात्र बोंबलदरा येथील माझ्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आज जो प्रकाश पडला आहे. तो मला मोलाचा वाटतो. त्या लख्ख प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मला खऱ्या अर्थाने समाधान देऊन गेला. 
- प्राजक्त तनपुरे, ऊर्जा राज्यमंत्री 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image