
अकोले : हुतात्मा जवान संदीप गायकर यांनी देशासाठी दिलेले बलिदान हा महाराष्ट्र व देश कधी विसरणार नाही. त्याच्या बलिदानाचे स्मरण हे नेहमी राहील. त्यांचे कुटुंबीय यांना महाराष्ट्रातील महायुती सरकार व शिवसेना पक्ष नेहमी त्यांच्याबरोबर आहे. त्यांना आवश्यक ती सर्व मदत आम्ही करू, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.