esakal | जन्मदात्या बापाकडून 11 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, आईची पोलिसांत तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

minor daughter sexually abused by father

संगमनेर : जन्मदात्या बापाकडून 11 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (जि. अहमदनगर) : राज्यात मुली आणि महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटना थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीयेत, राज्याला अशा घटनांनी हदरवून सोडलं असतानाच अहमदनगर जिल्ह्यातून आणखी एख धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पत्नी माहेरी गेल्याची संधी साधून जन्मदात्या बापानेच स्वत:च्या ११ वर्षाच्या चिमुरडीवर तीन वेळा अत्याचार केले.

ही घटना संगमनेरच्या उपनगरात घडली. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांनी बापाला अटक केली आहे. फिर्यादी महिला घरगुती वादातून माहेरी गेली असताना, मुलगी व तिचा बाप घरात होते. पोटच्या मुलीवरच नराधम बापाने ( ता. २२ व २८ जुलै २०२१) च्या रात्री तसेच दोन आठवड्यांनी पुन्हा एकदा असा तीन वेळा तिच्यावर अत्याचार केले. तिची आई घरी परतल्यानंतर हा प्रकार उघड झाला. यामुळे संतप्त झालेल्या आईने पोलिस ठाणे गाठून पतीच्या घृणास्पद कृत्याची माहिती देत फिर्याद दिली.

हेही वाचा: निळवंडेसाठी निधीची तरतूद का नाही? - राधाकृष्ण विखे पाटील

पोलिसांनी याप्रकरणी अत्याचारी बापाला अटक केली आहे. त्याला आज प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता चार ऑक्टोबर पर्यंत पाच दिवस पोलिस कोठडीत ठेण्याचा आदेश दिला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक निकीता महाले करीत आहेत.

हेही वाचा: नुकसानग्रस्तांना राज्य सरकार दिलासा देणार : जयंत पाटील

loading image
go to top