Ashutosh Kale
Ashutosh KaleSakal

साई संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार अशुतोष काळे

शिर्डी (अहमदनगर) : येथील साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली आहे. साई संस्थानचा कारभार सध्या न्यायाधीशांकडे होता. संस्थानवर स्थानिकांना संधी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार स्थानिक अध्यक्ष देण्याच्या हालचाली सुरु होत्या. तसेच, शिर्डी संस्थानवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार आमदार काळे यांची निवड अपेक्षित मानली जात होती.

अध्यक्षपदाच्या नावाबाबत सकाळ यापूर्वी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला. या पदास राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. आज रात्री उशीरा एकूण सतरा पैकी अकरा विश्वस्तांच्या नावाची यादी राज्याच्या विधी व न्याय विभागाने जाहिर केली. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अॅड.जगदिश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या मंडळातील अन्य सदस्यांची नावे पुढील प्रमाणे, अनुराधा आदिक(नगराध्यक्ष श्रीरामपूर) , अॅड.सुहास आहेर (संगमनेर), अविनाश दंडवते(साकुरी) , सचिन गुजर (श्रीरामपूर) , राहूल कनाल (मुंबई), सुरेश वाबळे(राहूरी) जयंतराव जाधव (नाशिक), महेंद्र शेळके(शिर्डी) , डाॅ.एकनाथ गोंदकर (शिर्डी ) व शिवाजी गोंदकर (नगराध्यक्ष शिर्डी, पदसिध्द).

Ashutosh Kale
पगार एकाचा, कामे होतात दुसरीच; अध्यापन सोडून गुरुजींचे उद्योग

नुतन अध्यक्ष आमदार काळे हे राष्ट्रवादी काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या गुडबूक मधिल आमदार म्हणून परिचित आहेत. पवार यांनी यापूर्वी त्यांच्याकडे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवीली. पाठोपाठ त्यांच्याकडे देशातील एक प्रमुख देवस्थान असा लौकीक असलेल्या साईसंस्थानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. कोपरगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करून उसाला सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून नावारूपास आणण्याची कामगीरी त्यांनी करून दाखविली आहे. आमदार काळे यांना नुकतेच पुत्ररत्न झाले त्यापाठोपाठ त्यांची साईसंस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाली. एक अर्थाने त्यांच्या दृष्टीने सप्टेबर महिना भाग्याचा ठरला.

तथापी अद्यापही सहा विश्वस्तांची नावे जाहिर करण्यात आलेली नाहीत. विश्वस्तपद निवडीचे निकष व पात्रतेचा पालन करण्यासाठी या नव्या यादित काही फेरबदल करण्यात आले. सुरेश वाबळे व डाॅ.एकनाथ गोंदकर यांना मंडळात दुस-यांदा संधी मिळाली. तर नगराध्यक्षसह एकूण तिन विश्वस्त शिर्डीतील आहेत.

Ashutosh Kale
'शेतकरी नवरा नको'ला शेतकरीपुत्राचे उत्तर! पंचक्रोशीत कौतुक

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी साईसंस्थानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. भाविकांचे हित डोळ्या समोर ठेऊन आपण हि जबाबदारी समर्थपणे पार पाडू. यापूर्वी अध्यक्षपदासाठी माझे नाव चर्चेत येताच कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गांवोगाव फटाक्यांची आतषबाजी झाली होती. कार्यकर्त्यांनी त्यावेळी साजरी केलेली आनंदाची दिवाळी आज प्रत्यक्ष साकार झाली. - आमदार आशुतोष काळे ( अध्यक्ष, साईसंस्थान )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com