

कोपरगाव : चांदेकसारे येथील सबस्टेशनकरिता जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच निविदा प्रक्रिया देखील पूर्ण होईल, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. विधानसभा निवडणुकीचा आभार दौरा व समस्या निवारण कार्यक्रमात चांदेकसारे येथे ते बोलत होते. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी व सरकरी अधिकारी उपस्थित होते.