खंडकरी शेतकऱ्यांसाठी सरसावले आमदार आशुतोष काळे

मनोज जोशी
Sunday, 13 December 2020

खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या नाहीत. ज्या शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या, त्या कमी आहेत. अनेक शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी जमिनी देण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी पूर्वीचे अतिक्रमण आहे, अशा समस्या शेतकऱ्यांनी मांडल्या.

कोपरगाव : खंडकरी शेतकऱ्यांना तालुकास्तरावर येत असलेल्या अडचणी तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी तातडीने सोडवाव्यात, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी केल्या. 

खंडकरी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय व शासनदरबारी पाठपुरावा सुरू असून, हे प्रश्‍न निश्‍चितपणे मार्गी लागतील, असेही ते म्हणाले. 

हेही वाचा - अहमदनगरचे कलेक्टर राहतात महालात

राहाता तालुक्‍यात खंडकरी शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गौतम बॅंकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, गोरक्षनाथ जामदार, सुरेश अभंग, भूमिअभिलेख अधीक्षक भास्कर कचरे, राहाता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ आदी उपस्थित होते. 

खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या नाहीत. ज्या शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या, त्या कमी आहेत. अनेक शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी जमिनी देण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी पूर्वीचे अतिक्रमण आहे, अशा समस्या शेतकऱ्यांनी मांडल्या.

आमदार काळे म्हणाले, ""ज्या समस्या तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्या अखत्यारीत येतात, त्या तत्काळ सोडवा. ज्या जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व शासनाच्या महसूल विभागाकडे प्रलंबित आहेत, त्यांबाबत आपण जातीने लक्ष घालून समस्यांचा निपटारा करू.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Ashutosh Kale's initiative for Khandakari farmers