आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा वाढदिवस पुस्तक मैत्रीदिन म्हणून साजरा होणार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले. अंध, अपंग, मूकबधिर, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम केले. नेता नव्हे मित्र अशी ओळख आपल्या  कार्यकर्तृत्वातून त्यांनी निर्माण केली. त्यांच्या पुस्तकप्रेमामुळे त्यांचा वाढदिवस पुस्तक मैत्रीदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

संगमनेर (अहमदनगर) : पुरोगामी विचारांचे पाईक व जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा रविवार (ता.17) रोजीच्या वाढदिवसानिमित्त हार, पुष्पगुच्छ न आणता, सामाजिक जाणीवेतून पुस्तक भेट देत, पुस्तक मैत्री दिन म्हणून सर्वांनी साजरा करावा असे आवाहन जयहिंद युवा मंचच्यावतीने करण्यात आले आहे.

सिध्दहस्त शल्यचिकित्सक असलेले आमदार डॉ. तांबे यांनी संगमनेरचे नगराध्यक्ष, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष ते विधानपरिषद सदस्य या काळात निरोगी समाज निर्मीतीचे कार्य हाती घेतले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, जयहिंद युवा मंचच्या माध्यमातून राज्यभर युवकांची मोठी फळी निर्माण केली. सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले. अंध, अपंग, मूकबधिर, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम केले. नेता नव्हे मित्र अशी ओळख आपल्या  कार्यकर्तृत्वातून त्यांनी निर्माण केली. त्यांच्या पुस्तकप्रेमामुळे त्यांचा वाढदिवस पुस्तक मैत्रीदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

या निमित्ताने भेट म्हणून आलेली पुस्तके शहर व तालुक्यातील ग्रंथालये, शाळा, विद्यालयांना भेट म्हणून देता येवू शकतील. या निमित्ताने त्यांच्या सामाजिक उपक्रमांना आणखी चालना मिळेल, असे आवाहन जयहिंद युवा मंचच्यावतीने करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Dr. Sudhir Tambe birthday will be celebrated as Book Friendship Day