
पारनेर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा जो ठेवा आहे, त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या नावाचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी केला जातो. शिवरायांचा हा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी त्यांच्या जपणुकीची मोहीम हाती घेण्याची वेळ खासदार नीलेश लंके व आमच्या सगळ्यांवर आली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.