सर्वांसाठी घर बांधुन देण्याचा सरकारचा प्रयत्न : आमदार कानडे

गौरव साळुंके
Tuesday, 15 December 2020

महा- आवास अभियान गतिमान करुन पुढील दोन वर्षामध्ये सर्वांसाठी घरे बांधून देण्यासाठी राज्य सरकारने विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : महा- आवास अभियान गतिमान करुन पुढील दोन वर्षामध्ये सर्वांसाठी घरे बांधून देण्यासाठी राज्य सरकारने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. 

सरकारी नियमांनुसार योग्य ती कारवाई करुन गोरगरीबांना हक्काची घरे मिळवून देवून त्यांचे अशिर्वाद घेण्याची ही मोठी संधी आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षात तालुक्यातील सर्व गोरगरीबांसाठी सरकारी निधीतुन घरे बांधुन देण्याची, ग्वाही आमदार लहू कानडे यांनी दिली.

येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात महा-आवास अभियानाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आमदार कानडे बोलत होते. याप्रसंगी पंचायत समिती सभापती संगिता शिंदे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सरपंच संदिप शेलार, सोन्याबापू शिंदे यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
महा-आवास अभियानाद्वारे गरजूंसाठी घर बांधणीचा कार्यक्रम ऐरणीवर येईल. सर्वांसाठी पक्के घर बांधून देण्याचे सरकारचे धोरण आहे. घरकुल बांधण्यासाठी येणारया अनेक अडचणी आता कायदेशिर पद्धतीने दुर होणार आहे.

तालुक्यातील सर्व गरजूंना घर बांधून देण्याचे कार्य तातडीने पुर्ण करण्याचा सुचना आमदार कानडे यांनी दिल्या आहे. कार्यशाळेच्या प्रारंभी गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी प्रास्ताविकात अभियानाची माहिती दिली. घरकुल बांधणीसाठी येणारया विविध अडचणींसह रेशन कार्ड विभक्त करण्याच्या प्रक्रियेसाठी प्रयत्नशिल असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली. सहायक गटविकास अधिकारी संजय दिघे यांनी सुत्रसंचलन करुन आभार मानले. विस्तार अधिकारी विजय चऱ्हाटे यांनी ग्रामसेवकांना अभियानाची प्राथमिक माहिती देवून सविस्तर मार्गदर्शन केले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Kanade said the government was trying to build houses for all