आमदार लंके म्हणतात, आपला विषयच वेगळाय चाललो की रॅली, थांबलो की सभा होते

विलास कुलकर्णी
Saturday, 5 December 2020

आमदार लंके म्हणाले, की पारनेर मतदारसंघातच नाहीतर राज्यात माझे चाहते आहेत. मी चालतांना रॅली आणि थांबलो की सभा सुरू होते. कार्यकर्ते जुळविणे माझा छंद आहे. 

राहुरी : "एकदा सत्तेची हवा डोक्‍यात घुसली की, त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला, असे समजावे. मी ऍडजेस्टेबल पान्हा आहे. कुठेही फिट बसतो. मी आमदार झालो. हे आजही खरे वाटत नाही. त्यामुळे, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कायम वावरतो, असे आमदार निलेश लंके यांनी सांगितले. 

मांजरी (ता. राहुरी) येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या स्थापनेप्रसंगी आमदार लंके बोलत होते. जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज गाढे, राहुल झावरे, नेवासे शिवसेनेचे बाळासाहेब पवार, रवींद्र आढाव, सरपंच विठ्ठल विटनोर, अण्णासाहेब थोरात, नानासाहेब जुंधारे, अण्णासाहेब सोडनर, भाऊसाहेब विटनोर, बापूसाहेब विटनोर, आप्पासाहेब जाधव उपस्थित होते.

राहुरी शहर, आरडगाव, मानोरी, वळण, मांजरी येथे शेकडो तरुणांनी आमदार लंके यांचे फटाक्‍यांच्या आतषबाजीत स्वागत केले. 

आमदार लंके म्हणाले, की पारनेर मतदारसंघातच नाहीतर राज्यात माझे चाहते आहेत. मी चालतांना रॅली आणि थांबलो की सभा सुरू होते. कार्यकर्ते जुळविणे माझा छंद आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Lanka says I will adjust anywhere