esakal | होम क्‍वॉरंटाईन व्हावे लागल्याने महसुलमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गैरहजेरी

बोलून बातमी शोधा

MLA Monica Rajale
होम क्‍वॉरंटाईन व्हावे लागल्याने महसुलमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गैरहजेरी
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

पाथर्डी (अहमदनगर) : कुटुंबातील काहींना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्यांच्या संपर्कात आल्याने मी स्वत:ची कोरोना तपासणी करुन घेतली. त्याचा अहवाल अद्यापही आलेला नसल्याने होमक्‍वॉरंटाईन व्हावे लागले. त्यामुळे शनिवारी पाथर्डी व शेवगाव येथे झालेल्या महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीला उपस्थित राहाता आले नाही, असे पत्रक आमदार मोनिका राजळे यांनी काढले आहे.

शेवगाव-पाथर्डी तालुक्‍यात शनिवारी (ता. 24) महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कोरोनाबाबत आढावा बैठका झाल्या. तसेच पाथर्डीत माजी आमदार राजीव राजळे कोविड सेंटरचे उद्‌घाटन झाले. यासह दोन्ही तालुक्‍यात झालेल्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणार होते. परंतु, कुटुंबातील काहींना कोरोनाची बाधा झाल्याने मला होम होमक्‍वॉरंटाईन व्हावे लागले. कोरोना चाचणीचा अहवाल अद्यापही आलेला नाही. नागरिकांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच कोणीही घराबाहेर पडू नये, लक्षणे जाणवल्यास चाचणी करावी, असे आवाहन राजळे यांनी पत्रकात केले आहे.