एक कोविड सेंटर म्हणजे मोठे काम नाही; आ. राजळेंचा पलटवार

monika rajale and pratap dhakane
monika rajale and pratap dhakaneesakal
Updated on

पाथर्डी (जि.अहमदनगर) : ‘‘शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात झालेला विकास मी तुम्हीला फिरुन दाखवते. बाकीचा विकास राहू द्या, तुमच्या केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याशेजारी केलेला रस्ता तरी पहा. एक कोविड सेंटर (covid center) सुरू केले म्हणजे खूप मोठे काम केले, असे त्यांना वाटते. गेली साडेचार वर्षे कुंभकर्णासारखे झोपेत असलेले विरोधक निवडणुका (elections) आल्या की जागे होतात. आम्ही कधी हाणामाऱ्या केल्या नाहीत,’’ अशी टीका आमदार मोनिका राजळे (monika rajale) यांनी ॲड. प्रताप ढाकणे (pratap dhakane) यांचे नाव न घेता केली.

आमदार मोनिका राजळे यांचा ॲड. प्रताप ढाकणे यांच्यावर पलटवार

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत माणिकदौंडी ते सोनाळवाडी या एक कोटी ६७ लाख व आल्हनवाडी ते काकडदरा या एक कोटी २६ लाख रुपये किमतीच्या रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बाबाजी बोरसे होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, धनंजय बडे, सोमनाथ खेडकर, अंकुश चितळे, सुनील ओव्हळ, बोरसेवाडीच्या सरपंच संजना बोरसे, राजेंद्र बोरसे, रावसाहेब मोरे, रंजना बोरसे उपस्थित होते. राजळे म्हणाल्या, ‘‘मतदारसंघात विकासकामे करताना जनतेची गरज कोणती, याला प्राधान्य दिले जाते. गावाची लोकसंख्या किती, आपल्याला किती मते मिळाली, याचा विचार कधीच केला नाही. त्यामुळेच सोनाळवाडी, काकडदरा सारख्या तीनशे ते चारशे लोखसंख्या असलेल्या दुर्गम गावाला दीड ते दोन कोटी रुपये रस्त्यांसाठी मंजूर करून मुख्य रस्त्यांना जोडले आहे, याचे समाधान वाटते. गेल्या पाच वर्षांत केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार होते. त्यावेळी पंकजा मुंडे ग्रामविकासमंत्री असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व जलयुक्तशिवार योजना सुरू केली. त्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक गावांत रस्ते व बंधाऱ्यांची मोठी कामे झाली. पाणीसाठा वाढला असून, सध्या पाऊस लांबला, तरी एकही टँकर सुरू करण्याची वेळ आली नाही.’’

‘‘मी सहा-सात वर्षांपासून कोणावरही टीका न करता काम करण्याला प्राधान्य दिले. ज्यांनी मला पदावर बसवले त्यांचाच मी विचार करते. इतरांचा विचार मी करत नाही. मी कधी कोणावर टीका केली नाही. तुम्ही मात्र कोविड सेंटर उद्‍घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह माझ्यावर टीका केली. आज सुरू केलेली कामे मागील सरकारच्या काळात मंजूर झालेली आहेत. सूत्रसंचालन प्रास्ताविक बाळासाहेब सोनाळे यांनी केले.

monika rajale and pratap dhakane
गोरगरिबांच्या पैशांवर काही पुढाऱ्यांची मजा - आ. नीलेश लंके

कोरोनाची भीती दाखवून योजना बंद

महाविकास आघाडी सरकाराने कोरोनाची भीती दाखवून अनेक योजना बंद केल्या. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चाळीस हजार किलोमीटर रस्ते करू, असे सांगितले. अद्याप एकाही रस्त्याचा आराखडा, सर्वेक्षण, प्रस्ताव मंजुरीही नाही, अशी टीका आमदार राजळे यांनी राज्य सरकारवर केली.

monika rajale and pratap dhakane
प्राध्यापकाच्या घरी जबरी चोरी अन् मुलांची चोरट्यांना विनवणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com