
संगमनेर : ‘पोलिस कारवाई करत नसतील, तर मीच वाळूची वाहने पकडतो,’ असा इशारा शासकीय विश्रामगृहात पोलिसांची बैठक घेऊन आमदार अमोल खताळ यांनी दिला होता. खताळ यांनी रविवारी (ता.४) संगमनेर तालुक्यातील समनापूर येथून अवैधरित्या वाळू वाहून नेत असलेला डंपर रायतेवाडी शिवारात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला.