esakal | ‘केके’ला राज्याचा विरोध आत्ताही आणि यापुढेही; आमदार लंके यांची दुसऱ्यांदा शरद पवार यांच्याशी भेट
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Nilesh Lanka met Sharad Pawar regarding KK Range

के. के. रेंज जमिन अधिग्रहणाबाबत राज्य सरकारचा विरोध आहे.

‘केके’ला राज्याचा विरोध आत्ताही आणि यापुढेही; आमदार लंके यांची दुसऱ्यांदा शरद पवार यांच्याशी भेट

sakal_logo
By
सनी सोनवळे

टाकळी ढोकेश्वरी (अहमदनगर) : के. के. रेंज जमिन अधिग्रहणाबाबत राज्य सरकारचा विरोध आहे. पुढेही राहिल. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना वस्तुस्थिती समजाऊन सांगून के. के. रेंजबाबतचा निर्णय बदलण्यास भाग पाडू, असे आश्वासन जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिले असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली.

के. के. रेंज जमिन अधिग्रहणाबाबत लष्कराने पारनेर, राहुरी व नगर तालुक्यातील जमीनीचे हस्तांतर करण्यासाठी लष्काराकडून हालचाली सुरू झाल्या असून त्या भागातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. याप्रश्‍नी पवार यांनी हस्तक्षेप करावा यासाठी बुधवारी (ता. ९) आमदार लंके यांनी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवार यांची दुसऱ्यांदा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी पवार म्हणाले, काळू तसेच मुळा धरणामुळे या भागातील जमीनी शेतकऱ्यांनी विकसीत करून त्या बागायती झाल्या आहेत.

भुसंपादन झाल्यामुळे येथील नागरीक पूर्वीच विस्थापित झालेले आहेत.ही वस्तुस्थिती आपण केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत.पुढील आठवडयात लोकसभेच्या अधिवेशन काळात संरक्षण मंत्र्यांच्या भेटीची वेळ ठरविण्यात येईल.या प्रकल्पाच्या विस्तारास आपला पहिल्यापासून विरोध होता, यापुढेही राहिल असे स्पष्टपणे सांगितले.या बैठकीस आमदार लंके यांनीही उपस्थित राहण्याचे पवार यांनी सुचविले आहे. यावेळी वनकुटे चे सरपंच अ‍ॅड राहुल झावरे, निघोजचे सरपंच ठकाराम लंके, विजय औटी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर