esakal | वाढदिवसाला आमदारांनी पारनेरच्या जनतेला दिलं खास गिफ्ट
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Nilesh Lanke on his birthday has sanctioned funds for various road works in the taluka for Parnerkar

या पुर्वीच लंके यांनी तालुक्याच्या विविध विकास कामांसाठी शंभर कोटी रूपयांचा आराखडा तयार केला होता.

वाढदिवसाला आमदारांनी पारनेरच्या जनतेला दिलं खास गिफ्ट

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : विकासाचा मुख्य मार्ग म्हणजे रस्ते होय. याची खूनगाठ मनाशी बांधत आमदार निलेश लंके यांनी आपल्या वाढदिवशीच पारनेरकरांसाठी तालुक्यातील विविध रस्ते कामांसाठी चार कोटी 15 लाख 34 हजार रूपये मंजूर करून तो निधीही संबंधित कामासाठी वर्ग झाल्याची माहिती आमदार लंके यांनी देऊन पारनेरकरांना वाढदिवसाची एक अनोखी भेट दिली आहे.

तालुक्यातील अनेक रस्ते खराब झाले होते. रस्ते हे दळणवळणाचे प्रमुख मार्ग असून विकासाचा प्रमुख मार्ग आहे. हे विचारात घेऊन त्यांनी राष्ट्रीय महामार्ग 222 ते वासुंदे वनकुटे रस्त्यासाठी 95 लाख 93 हजार, वाडेगव्हाण कळमकर वाडी, पाडळी कडूस या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 61 लाख 29 हजार भाळवणी  गोरेगाव, वडगावदर्या रांधे आळकुटी ते चोंभूत या रस्त्यासाठी 78 लाख 34 हजार, मांडवे पोखरी अक्कलवाडी या रस्त्यासाठी 81 लाख 12 असे चार कोटी 15 लाख 34 हजार रूपये मंजूर करून आणले आहेत. याच बरोबर जातेगाव राळेगणसिद्धी ते राळेगण थेरपाळ या रस्त्यासाठीही मंजूरी मिळाली असल्याचेही लंके यांनी सांगितले. 

या पुर्वीच लंके यांनी तालुक्याच्या विविध विकास कामांसाठी शंभर कोटी रूपयांचा आराखडा तयार केला होता. त्या आरखड्यास मंजूरीही मिळाली होती. मात्र कोरोनामुळे या निधीस कात्री लागली आहे. आता कोरोना कमी झाल्यानंतर मात्र या पुढील काळात पुन्हा तो निधी मिळविण्यासाठी लंके यांच्यावतीने प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रस्ते कामांसाठी निधी मिळविण्यात आला आहे. आपल्या वाढदिवशीच तालुक्यासाठी एवढा मोठा निधी त्यांनी मंजूर झाल्याचे लंके यांनी सांगितले आहे. या निमित्ताने लंके यांच्याकडून तालुक्याला आपल्या वाढदिवशीच एक अनोखी भेट मिळाली आहे.

loading image