esakal | पाच वर्षात मतदार संघात जास्तीत जास्त विकासकामे करू
sakal

बोलून बातमी शोधा

Niliesh Lanke.jpg

आ.लंके म्हणाले की, शासकीय योजना राबविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. मतदार संघातील मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देवून ते लवकरात लवकर कसे मार्गी लागतील, याकडे लक्ष दिले जाईल. येत्या पाच वर्षात मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलेला असेल. 

पाच वर्षात मतदार संघात जास्तीत जास्त विकासकामे करू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भाळवणी (नगर) : नगर पारनेर मतदार संघातील मतदारांनी टाकलेला विश्वास येत्या पाच वर्षात मतदार संघात जास्तीत जास्त विकासकामे करून सिध्द करून सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.

भाळवणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्याचे भूमिपूजन आ.लंके यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अशोक सावंत, गंगाराम रोहोकले, संभाजीराव रोहोकले, बाबासाहेब तरटे, अशोक रोहोकले, राहुल झावरे, सुवर्णा धाडगे, नानासाहेब रोहोकले, संदीप भागवत, प्रा.बबनराव भुजबळ, सुरज भुजबळ, प्रमोद गोडसे, सुरेश धुरपते, विक्रम कळमकर, प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.

आ.लंके म्हणाले की, शासकीय योजना राबविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. मतदार संघातील मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देवून ते लवकरात लवकर कसे मार्गी लागतील, याकडे लक्ष दिले जाईल. येत्या पाच वर्षात मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलेला असेल. 

आ.लंके यांच्या हस्ते भाळवणी सह ढवळपुरी, गोरेगाव, दैठणे गुंजाळ या गावात विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अशोक रोहोकले यांनी कोविड सेंटरसाठी ११ हजार रूपयांची देणगी देण्यात आली.

संपादन - सुस्मिता वडतिले