
अहिल्यानगर : रात्रीच्या अंधारात पांढऱ्या पोशाखातील व्यक्ती उभी असते... ती एका मोटारसायकलस्वाराला हात करते... समोर थांबलेली व्यक्ती पाहून तो आचंबित होतो... ते एका ठिकाणी सोडण्याची विनंती करतात. मग त्या गाडीवानाला आनंद, आश्चर्य, कुतूहल सर्वच दाटून येते. कारण ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नव्हे, तर अहिल्यानगरीचे आमदार संग्राम जगताप असतात.