esakal | खर्डा किल्ला परिसरात श्री छत्रपती महाराजांचा 'पुतळा' उभारणार : आमदार रोहित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Rohit Pawar announced that a statue of Shri Chhatrapati Maharaj will be erected in Kharda fort area.jpg

या ऐतिहासिक प्रेरणादायी घटनेची नोंद जामखेडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीली जाईल. आमदार पवारांच्या या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये नवचैतन्य संचारले असून त्यांच्या निर्णयाचे 'कौतुक' आणि 'स्वागत' होत आहे.

खर्डा किल्ला परिसरात श्री छत्रपती महाराजांचा 'पुतळा' उभारणार : आमदार रोहित पवार

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : इतिहासाचा साक्षीदार असलेल्या खर्डा किल्ला परिसरात दोन एकर जागेवर शुशोभिकरण करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य 'पुतळा' उभारणार असल्याचे आमदार रोहित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खर्डा येथे अयोजित कार्यक्रमात जाहीर केले. या निर्णयामुळे तालुक्यातील पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्याचा 'मान' आमदार रोहित पवारांना मिळणार हे मात्र निश्चित ! 

या ऐतिहासिक प्रेरणादायी घटनेची नोंद जामखेडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीली जाईल. आमदार पवारांच्या या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये नवचैतन्य संचारले असून त्यांच्या निर्णयाचे 'कौतुक' आणि 'स्वागत' होत आहे.

नगर जिल्याच्या प्रवेशद्वारी खर्डा येथे ऐतिहासिक व धार्मिक वास्तूंचा 'खजिना' आहे. येथे असलेला तटबंदी वजा बांधकाम असलेला भुईकोट किल्ला मराठ्यांच्या शेवटच्या विजयी लढाईचा 'साक्ष' देत स्वतः चे अस्तित्व टिकवून उभा आहे. परिसरात प्रतिज्योर्तिंलींगाचे बारा शिवालये आहेत. गावातही ऐतिहासिक वास्तू आहेत. यामध्ये ताकभाते वाडा, निंबाळकरांची गडी, निंबाळकरांची छत्री (समाधीस्थळ), घोड्यांच्या पागा, गावच्या प्रवेशद्वारी भव्य वेशी आहेत. त्यापैकी काहींची पडझड झाली तर काही शेवटच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. त्यांचेही पुन्नर्जीवन यानिमित्ताने होऊ शकेल. 

ही तिर्थक्षेत्र विकसित होणार

श्री क्षेत्र सीताराम गड व  संत गीते बाबा मंदिर परिसर या भागातील लोकांचे श्रध्दास्थान या परिसराचे पावित्र्य वाढवित आहे. आमदार रोहित पवारांनी हे ओळखले आणि 'धार्मिक आणि ऐतिहासिक' वास्तुंचे पुन्नर्जीव करून धार्मिक स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या माध्यमातून होत असलेले हे काम इतिहास प्रेमीं बरोबरच पर्यटकांच्या मनावर राज्य करणारे ठरेल हे मात्र निश्चीत !
 
इतिहासाचा साक्षीदार असलेला खर्डा किल्ला 'कात' टाकतोय

येथे शुशोभिकरण करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य पुतळ्याची उभारणी आमदार रोहित पवार करणार आहेत. याकरिता शासकीय स्तरावरील सर्व सोपस्कर पूर्ण करुन ही स्थापना होणार आहे. खर्डा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमात आमदार रोहित पवारांनी जाहीर देखील केले. किल्ला परिसरात भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याने तालुक्यातील पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा मानही आमदार रोहित पवारांना मिळेल. त्याची तालुक्याच्या इतिहासात नोंद होईल. तसेच प्रेरणास्थान लक्षवेधी ठरेल हे मात्र निश्चित..! 

तिर्थक्षेत्र विकसित करणार !

खर्डा येथील श्री क्षेत्र सीताराम गडावर पांडूरंगाची मूर्ती बसविली  जाणार आहे. तर संत गीते बाबा मंदिरस्थळी संत गीते बाबा व संत भगवान बाबा या गुरु-शिष्यांची मूर्ती विधीवत पूजन करुन स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रोहित पवार प्रति शरद पवार ! जामखेडकरांना आली अनुभूती

जामखेडला शिवजयंतीच्या कार्यक्रमावेळी आमदार रोहित पवार आले. त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि वरुणराजाचे आगमन झाले. मात्र आमदार पवारांनी संतधार पाऊसातही शांत, संयमाने भाषण केले. त्यांनी यावेळी दाखविलेली मुस्त्सदेगिरी अनेकांना त्यांचे आजोबा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत सातारा येथे भर पाऊसात केलेल्या भाषणाची आठवण करुन देणारी ठरली. पाऊसातल्या या भाषणामुळे आमदार रोहित पवार म्हणजे प्रति शरद पवारच, असे जामखेडकरांनी अनुभवले. 

loading image