भाजपसाठी प्रतिष्ठेची पण महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक निष्ठेची होती

अशोक मुरुमकर
Friday, 4 December 2020

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजप विरुद्ध एकत्रीत रिंगणात उतरत चार जागांवर विजय मिळाला आहे.

अहमदनगर : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजप विरुद्ध एकत्रीत रिंगणात उतरत चार जागांवर विजय मिळाला आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यक्रमर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. यावर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती.

विधान परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेसह सहयोगी पक्ष एकत्र होते. कार्यकर्त्यांनी या माध्यमातून एकमेकांबद्दल निष्ठाच यानिमित्ताने दाखवली आहे. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची 'जागा' दाखवून दिली, असा टोला देखील आमदार पवार यांनी भाजपला लगावला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. 

नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीमुळे जबर धक्का बसला आहे. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. आमदार पवार यांनी ट्विट करुन प्रतिक्रीया दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने मविआची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची 'जागा' दाखवून दिली. 

भाजपचे म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत इथं महाविकासआघाडीने विजयाचा झेंडा रोवला. त्यामुळं आतातरी महाराष्ट्र भाजपने ने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Rohit Pawar criticizes BJP after the results of the Legislative Council