सुशांत सिंह प्रकरणावरुन आमदार रोहित पवार यांनी भाजपला काय दिलं उत्तर वाचा

अशोक मुरुमकर
Wednesday, 19 August 2020

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासणीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात घडामोडींना वेग आला. 

अहमदनगर : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासणीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात घडामोडींना वेग आला. भाजपने सरकार टीका केली आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयंते’ असं ट्विट केले होते. आता आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत भाजपला लक्ष केले आहे.

न्यायालयाच्या आदेशामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकाणाचा तपास मुंबई पोलिसांकडून आता सीबीआयकडे गेला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे जाताच राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

भाजपच्या नेत्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे. 

याबाबत कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन म्हटलंय की, ‘सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर आहे. सुशांतसिंगला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. तसंच या प्रकरणात राज्य सरकार व मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीचा मला आदर असून माझा या संस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

पुढे आमदार पवार यांनी असं म्हयलंय की, शबरीमला मंदिर प्रवेशाच्या निकालावेळी भाजपाचे मोठे नेते सुप्रीम कोर्टवर टीका करत होते. याचा आज सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजप नेत्यांना कदाचित विसर पडलेला दिसतो. पूरक भूमिका नसेल तर एखाद्या संस्थेवर टिका करण्याचे राजकीय संस्कार आमचे नाहीत, असंही आमदार पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तपासणीबाबत सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनंतर मुंबईत मोठ्या घडामोडी घडत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Rohit Pawar criticizes BJP in Sushant Singh Rajput case