esakal | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आमदार रोहित पवारांना उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Rohit Pawar had drawn attention to the education of the children of sugarcane workers. Social Justice Minister Dhananjay Munde has responded to this by tweeting.

आमदार रोहित पवार यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष वेधले होते. याला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. ‘ही मुलं फडात नाही तर लवकरच चांगल्या शाळेत दिसतील’, असं त्यांनी म्हटलं आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आमदार रोहित पवारांना उत्तर

sakal_logo
By
अशोक मुरूमकर

अहमदनगर : आमदार रोहित पवार यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष वेधले होते. याला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. ‘ही मुलं फडात नाही तर लवकरच चांगल्या शाळेत दिसतील’, असं त्यांनी म्हटलं आहे.

साखर कारखाने सुरु झाल्याने सध्या अनेक भागात ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत. सकाळी कडाक्याच्या थंडीत ऊस तोडण्यासाठी कामगार जातात. अनेक कामगारांबरोबर लहान मुलं आहेत. या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न गंभीर आहे. यावर कर्जत जामखेड विधानसभा मतदासंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली असून यात लक्ष घालावे लागणार असल्याचे त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना सांगितले होते. याला मंत्री मुंडे यांनी गांभीर्याने घेऊन ट्विट करत उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आपण ऊसतोड कामगारांच्या लेकरांची परवड व शैक्षणिक नुकसान कायमचे थांबावे व त्यांचे भविष्य उज्वल व्हावे या दृष्टीने स्व. गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाययोजना करत आहोत. ही मुलं फडात नाही तर लवकरच चांगल्या शाळेत दिसतील!

हे ही वाचा : ऊसतोड कामागारांच्या मुलांबाबत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली चिंता; मुंडेंनी लक्ष घालण्याची मागणी

मराठवाड्यातून ऊस तोडण्यासाठी दरवर्षी मोठ्याप्रमाणात कामगार येतात. ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी दरवर्षी साखर कारखान्यावर ‘साखर शाळा’ सुरु केल्या जातात. यामध्ये काही ऊसतोड कामागारांची मुले शाळेत जातात. किंवा ज्या गावात ऊसतोड कामगार आहेत. त्या शाळेत त्यांच्या मुलांची व्यवस्था करण्याबाबतही सरकारने निर्णय घेतला होता. मात्र, दरवर्षी याची अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. यावर्षी तर कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सरकारने शाळाही सुरु केलेल्या नाहीत. त्यातच अद्याप शाळाही सुरु झालेल्या नाहीत. मात्र, ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. या शिक्षणापासून ऊसतोड कामगारांची मुलं वंचित आहेत. याकडे आमदार पवार यांनी लक्ष वेधले आहे. यावर त्यांनी चिंत व्यक्त करत ट्विट केले आहे.

यामध्ये पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना टॅग करत लक्ष घालण्याबाबत सांगितले आहे. यात लक्ष घालतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, माझ्या मतदारसंघातील काही ऊसतोड कामगार कुटुंबांची भेट झाली असता त्यांच्या लहान मुलांना शाळेऐवजी ऊसाच्या फडात पाहून वाईट वाटलं. या मुलांच्या हाती कोयत्याऐवजी लेखणी देण्यासाठी विशेष लक्ष द्यावं लागणार आहे आणि आपण ते द्याल, असा विश्वास आहे.


संपादन - सुस्मिता वडतिले