लोकांच्या हितासाठी जातीय राजकारण नाही तर फक्त विकासाचं राजकारण करायचंय

MLA Rohit Pawar has said that he wants to do politics of development and not ethnic politics for the benefit of the people.jpg
MLA Rohit Pawar has said that he wants to do politics of development and not ethnic politics for the benefit of the people.jpg
Updated on

अहमदनगर : 'लोकांना विश्वासाने दिलेला शब्द माझ्यासाठी महत्वाचा असतो. लोकांच्या मागणीनुसार या कामासाठी पाठपुरावा केला. वरिष्ठ नेत्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आणि हे काम मार्गी लागले. खेड, भांबोरा या उपकेंद्रांवर पडणारा अतिरिक्त भारही कमी होईल. आता इथले राजकारण बदलेल आणि विकासाच्या राजकारणाकडे सर्वांचा कल राहील. लोकांच्या हितासाठी जातीय राजकारण नाही तर फक्त विकासाचं राजकारण करायचंय, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

गणेशवाडी (ता.कर्जत) येथे 'दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत' कार्यान्वित झालेल्या ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्रांच्या उद्घाटन व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास कायगुडे हे होते. उपसभापती हेमंत मोरे, कल्याण दातीर, बाबुलाल शेख, लालासाहेब कायगुडे, नामदेव आप्पा कायगुडे, ज्ञानदेव खताळ, शिवाजी ठोंबरे, विजय देवकाते, राम पाडुळे, संतोष मदने, दादा पाडुळे, भिवराज कायगुडे, गणपत कायगुडे, गणेश मराळे, लाला माने, उत्तम कायगुडे, भरत पावणे, किशोर दुरगुडे तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता सुरेश कुऱ्हाडे, उपकार्यकारी अभियंता अशोक घुले, चाचणी विभागाचे रोहन धर्माधिकारी, सहाय्यक अभियंता संदिप जाधव, यंत्रचालक संतोष कांबळे, तंत्रज्ञ गैातम खटके आदी यावेळी उपस्थित होते.

आमदार पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी पानंद रस्ते मोहीम हाती घेण्यात आली असून कर्जतचे ९५ तर जामखेडचे १०० पानंदरस्ते होत आहेत. बुडीत बंधाऱ्याचा जिव्हाळ्याचा विषयही मार्गी लागणार असून भिमा पात्रात सुमारे ४२ कि.मी पर्यंत बॅकवॉटरचा फुगवटा कायम राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये.

प्रास्ताविकात उपकार्यकारी अभियंता अशोक घुले म्हणाले, दिनदयाल उपाध्याय योजनेत हे काम प्रस्तावित झाले होते, मात्र गेली तीन वर्षांपासून हे काम अर्धवट अवस्थेत पडून होते. आमदार रोहित पवारांनी पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले.

रविंद्र पाडुळे म्हणाले, वीज आणि रस्ते या दोन्ही गरजा पूर्ण झाल्या असून शेतकरी हितासाठी हाती घेण्यात आलेल्या बुडीत बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला तर दुष्काळाची झळ पोहोचणार नाही.
  
यावेळी विजय कायगुडे, महादेव कायगुडे आदींनीही मनोगत व्यक्त केले.

...अन् रोहित पवार अधिकाऱ्यांवर भडकले!

'रोहित्र जोडणीसाठी शेतकऱ्यांकडून महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याच्या काही तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. हे मी खपवूनही घेणार नाही, शेतकऱ्यांचे फोन वेळेत घ्या, त्यांना सहकार्य करा. तेही तुम्हाला सहकार्य करतील. नाहीतर माझ्यासारखा विचित्र माणूस कुणी नाही, असे म्हणत आमदार पवार उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भडकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com