
श्रीगोंदे : येथील दुय्यम कारागृहात मोबाईल फोन सापडल्याचा धक्कादायक प्रकार महिनाभरापूर्वी घडला आहे. या प्रकारामुळे तुरूंग प्रशासन व पोलिस कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दरम्यान, सदर बराकीत न्यायालयीन कोठडीतील आरोपी असल्याने घटनेची जबाबदारी आमची नसल्याचे सांगत पोलिसांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे.