Ahilyanagar Crime : वारकऱ्यांचे मोबाईल चोरीस, दोन तासांत आरोपीला अटक
सरला बेट दिंडीतील वारकरी श्रीरामपूर येथे मुक्कामी थांबले होते. विश्रांतीदरम्यान चार्जिंगला लावलेले तीन मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. ही माहिती शहर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळताच त्यांनी तपास पथकाला तात्काळ घटनास्थळी पाठवले.
Police apprehend thief within two hours after mobile phones were stolen from Warkaris during the procession.Sakal
श्रीरामपूर : श्रीक्षेत्र सरला बेट धामच्या दिंडीतील वारकऱ्यांचे स्वयंवर मंगल कार्यालयात थांबलेल्या ठिकाणी मोबाईल चोरीचा प्रकार घडला. परंतु, शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत तपास करून चोरट्याला अटक केली आणि तीन मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्त केले.