नेप्ती शिवारातून मोबाईल चोरास अटक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 December 2020

सडे (ता. राहुरी) येथे कामानिमित्त आलेल्या गोरख रामा चव्हाण (रा. नांदगाव, जि. नाशिक) यांचा चार्जिंगला लावलेला मोबाईल कोणीतरी चोरून नेला. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

नगर : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाने नेप्ती शिवारातून मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली.

आज दुपारी ही कारवाई झाली. विजय सुदाम बर्डे (रा. देवीनिमगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, गोरख अशोक बर्डे (रा. राहुरी खुर्द) याचे गुन्ह्यात नाव निष्पन्न झाले. 

सडे (ता. राहुरी) येथे कामानिमित्त आलेल्या गोरख रामा चव्हाण (रा. नांदगाव, जि. नाशिक) यांचा चार्जिंगला लावलेला मोबाईल कोणीतरी चोरून नेला. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्यातील मोबाईल विजय बर्डे याने चोरला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नेप्ती येथे सापळा लावून त्याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गोरख बर्डेच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली देऊन मोबाईल काढून दिला. तपासाकामी आरोपीला राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile thief arrested from Nepti Shivara