टोलनाका तोडफोडप्रकरण : दरोड्यातील आरोपी लॉरेन्स स्वामीसह आठ जणांविरुद्ध ‘मोक्का'चा प्रस्ताव 

सुर्यकांत वरकड
Sunday, 13 December 2020

दरोड्यातील आरोपी लॉरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांविरुद्ध "मोक्का' कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव मंजुरीसाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

अहमदनगर : दरोड्यातील आरोपी लॉरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांविरुद्ध "मोक्का' कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव मंजुरीसाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. 

लॉरेन्स स्वामी, प्रकाश भिंगारदिवे, संदीप शिंदे, विक्रम गायकवाड, बाबा ऊर्फ भाऊसाहेब आढाव, संदीप वाकचौरे, अर्जुन ठुबे, बाळासाहेब भिंगारदिवे यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून, रस्तालूट, जबरी चोरी, घरफोडी, अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.

भिंगार छावणी परिषदेचा "टोल'नाका तोडफोड व कर्मचाऱ्यांना मारहाण करून लूट केल्याच्या गुन्ह्यात लॉरेन्स स्वामी याचे नाव समोर आले. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला घरातून अटक केली. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी लॉरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांविरुद्ध "मोक्का'च्या कारवाईसाठीचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mocca proposal against eight people including Lawrence Swamy