नगरमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करत मोहरम

अशोक मुरुमकर
Monday, 31 August 2020

नगरमध्ये कोरोनाबाबत सरकारने केलेल्या नियमांचे पालन करत मुस्लिम बांधवांनी मोहरम साजरा केला.

अहमदनगर : नगरमध्ये कोरोनाबाबत सरकारने केलेल्या नियमांचे पालन करत मुस्लिम बांधवांनी मोहरम साजरा केला. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने केलेल्या नियमावलीचे पालन करत मिरवणूक न काढता येथे मुस्लिम बांधवांनी मोहरमच्या सवाऱ्यांचे जागेवरच विसर्जन केले. कोठला येथे छोटे इमाम व हवेली येथे बडे इमाम यांच्या सवाऱ्यांची स्थापना झाली होती. त्याच जागेवरच या सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले. 

नगरमध्ये मोहरमनिमित्त मोठी विसर्जन मिरवणूक काढली जाते. यावर्षी मात्र कोरोना व्हायरसमुळे विसर्जन मिरवणुकीबाबत निर्बंध घालण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी सर्व नियमांचे पालन करीत नगरमध्ये सवाऱ्यांचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला.

कोठला व हवेली या दोन्ही ठिकाणी अतिशय शांतता आणि धार्मिक वातावरणात सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले. सवारी विसर्जनासाठी मोजक्याच भाविकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासनातर्फे त्यांना पास देण्यात आले होते. कोठला परिसरात कोणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moharram in the city following the rules of the corona