
पाथर्डी : नदीजोड योजनेच्या माध्यमातून जायकवाडी व मुळा धरणातून उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेती सिंचनासाठी गोदावरी खोरे परिसरात ऐंशी टीएमसी पाणी वळविण्याचे शासनस्तरावर प्रस्तावित आहे. या योजनेत पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील गोदावरी खोरे परिसरातील कायम दुष्काळी गावांचा सामावेश करण्यात यावा, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.