esakal | अकोलेत पाणी हक्क संघर्ष समितीचा मोर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

akole

अकोलेत पाणी हक्क संघर्ष समितीचा मोर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोले: उजव्या उच्चस्तरीय कालव्यात पाणी सोडण्यासाठी प्रवरा नदीवरील जलसेतूचे काम तातडीने पूर्ण करावे, उजव्या व डाव्या उच्चस्तरीय कालव्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत आणि त्यासोबतच डोंगरांच्या पायथ्यापर्यंतचे क्षेत्र सिंचित व्हावे यादृष्टीने कालवे व उप कालव्यांचा विस्तार करून ही कामे तातडीने पूर्ण करावी,तसेच भंडारदरा व निळवंडे जलसाठ्याचे संयुक्त जलव्यवस्थापन करून अकोले तालुक्यातील शेतीला बारमाही पाणी द्यावे ई. मागण्यांसाठी आज दुपारी शुक्रवारी पाणी हक्क समितीच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला.

मोर्चामध्ये लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तालुक्याचे लोकप्रतिनिधी आ.डॉ. किरण लहामटे हेही सभास्थळी उपस्थित होते. हा मोर्चा अकोले येथील महात्मा फुले चौकातून घोषणा देत बाजार तळावर पोहोचला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर महिलांचा सुद्धा सहभाग होता.

मोर्चेकऱ्यांनी ट्रॅक्टरसहीत या मोर्चात सहभाग नोंदविला. लाभ क्षेत्रातील बाजारतळ येथे कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले.तसेच हे प्रश्न मार्गी न लागल्यास यापेक्षा अधिक व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अकोले शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी काढण्यात आलेल्या भव्य मोर्चा नंतर बाजारतळावर सभा घेण्यात आली यावेळी आमदार किरण लहामटे, कॉ.डॉ.अजित नवले,कॉ कारभारी उगले ,शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ,आप्पा आवारी,परबत नाईकवाडी,सुरेश भिसे,महेश नवले,बाळासाहेब भोर,विनय सावंत,व इतर असंख्य मान्यवर उपस्थित होते या वेळी सभेला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

loading image
go to top