मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांच्या हाकेला ओ देऊन लाल महाल ते लाल किल्ला असे आंदोलन करू

शांताराम काळे
Saturday, 17 October 2020

एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून महात्मा फुले चौकातून मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात सुरुवात झाली.

अकोले (अहमदनगर) : एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून महात्मा फुले चौकातून मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात सुरुवात झाली. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा बाजारतळ येथे आढवला. त्यानंतर त्याचे रुपांतर सभेत झाले. येथे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी निवेदन स्विकारले. पोलिस निरीक्षक आरविंद जोधंळे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

या सभेच्या अध्यक्षस्थानी सीताराम गायकर होते. मराठा समाजाला आरक्ष मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने आज मोर्चा काढला होता. याला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. यावेळी झालेल्या सभेत हजारो मराठी बांधव सहभागी झाले होते. मराठा समाजावर होणाऱ्या आन्याबाबत वाचा फोडण्यात आली. 

विद्यार्थी संघटनेच्या तालुकाध्यक्ष आश्‍विनी काळे म्हणाल्या, मराठा समाजाला वेटीस न धरता सरकारने आम्हाला आमचा न्याय व हक्क मिळवून द्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊन यापेक्षा अधिक तिव्र आंदोलन करु. आरक्षणाचा मुद्दा अढकल्याने मराठा समाजाला दाहीदिशा फिरावे लागत आहे. रेश्‍मा गोडसे म्हणाला, मराठा समाजाने आतापर्यंत प्रत्येकाला योगदान दिले आहे. मात्र, सर्व समाजाला न्याय देताना मराठा समाजावर अन्याय का? आम्हाला कोणाचे आरक्षण काढून मिळावे, असे नाही तर आम्हाला स्वत:चे आरक्षण द्यावे.

मंत्री मधुकर पिचड म्हणाले, मराठा, मुस्लिम आरक्षण मिळावे यासाठी राणे समितीमध्ये काम करण्याचे भाग्य मिळाले. मात्र न्यायलयाने आरक्षण फेटाळल्याने दुःख झाले. यापुढे संभाजीराजे यांचे हाकेला ओ देऊन लाल महाल ते लाल किल्ला असे आंदोलन करून आरक्षण मिळवू. त्यासाठी सर्वांनी जागृत राहावे. एकमेकात भांडणे लावण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन हा प्रश्न निकाली काढल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. 

अनिल झोलेकर, मनसे राज्य उपाध्यक्ष, मराठा क्रांतीचे सुरेश नवले, मारुती मेंगाळ, दीपक महाराज देशमुख, बी. जे. देशमुख, महेश नवले, मच्छिंद्र देशमुख, संभाजी दहातोंडे, गिरजाजी जाधव, यशवंत आभाले, अनिकेत चौधरी, श्रवणी गोडसे, जालिंदर वाकचौरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे, निवृत्ती महाराज देशमुख, मधुकर नवले, शिवाजी धुमाळ, अशोक भांगरे, भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, काँग्रेसचे बाळासाहेब नाईकवाडी, शिवसेनेचे महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ यांनी पाठीबा जाहीर केला. 

अध्यक्षीय भाषणात सीताराम गायकर यांनी मराठा समाजाची लढाई ही न्यायासाठी असून ते मिळावे म्हणून असल्याचे सांगितले. सुत्रसंचलन भाऊसाहेब वाकचौरे यांनी तर आभार राजेंद्र गवांदे यांनी मानले. हभप इंदुरीकर महाराज हे पब्लिकमध्ये बसले.  भाषण न करता निघून गेले. मात्र मी पाठिंबा देण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morcha for reservation of Maratha community in Akole taluka