जास्तीत जास्त जमीन  ओलिताखाली आणणार

More and more land will be brought under Olita
More and more land will be brought under Olita

टाकळी ढोकेश्वर,  : ""पारनेरसारख्या दुष्काळी तालुक्‍यात गावोगावी मोठ्या जलसाठ्यांची अत्यंत गरज आहे. यामुळे विहीर व भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होते. तालुक्‍यातील पाणीप्रश्नावर लक्ष केंद्रित करून, जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न करू,'' असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले.

काळकूप (ता. पारनेर) येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अडसूळ वस्ती येथील साठा बंधाऱ्याकरिता झावरे यांनी निधी उपलब्ध केला. त्याचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. झावरे म्हणाले, ""माजी आमदार (स्व.) वसंतराव झावरे यांच्या कार्यकाळात तालुक्‍यात काळू मध्यम प्रकल्प, भांडगाव मध्यम प्रकल्प, मांडओहोळ चारी अस्तरीकरण, पिंपळगाव जोगे कालवे, शिवडोहसह अन्य मोठी कामे झाली.

त्यानंतर मीदेखील शासनाच्या विविध योजनांतून 75 बंधारे, दोन नदीजोड प्रकल्प यशस्वीरीत्या साकारले. यापुढील काळातही पाणी अडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.'' 

वडनेर हवेलीचे सरपंच लहू भालेकर, नंदू भालेकर, सरपंच बाबासाहेब खरमाळे, बाळासाहेब सालके, भाऊसाहेब शिंदे, सुंदरदास कदम, भागा कदम उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com