
२७ ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजअखेर एक हजारहुन अधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील २७ ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजअखेर एक हजारहुन अधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आज सायकांळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने प्रशासकीय इमारतीमध्ये दुपारपासून रात्री उशिरापर्यंत उमेदवारासंह गावपुढाऱ्यांची गर्दी होती.
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या २७९ ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी १५ जानेवारीला सार्वत्रिक निवडणूक होत आहे. बुधवारपासून (ता. २३) आजअखेर अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात आले. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी अडचणीच्या तक्रारी वाढल्याने अंतिम टप्यात ऑपलाईन अर्ज स्विकारण्यास परवानगी दिली. त्यामुळे आज सायंकाळी उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्यात आले.
आज दिवसभरात बेलापूर खुर्द १२, वळदगाव १९, मालुंजा बुद्रुक २९, मातुलठाण सात, सराला ११, घुमनदेव सात, एकलहरे १९, टाकळीभान ३२, वडाळा महादेव १६, गळनिंब १४, भेर्डापूर १३, ब्राह्मणगाव वेताळ २४, लाडगाव नऊ, गोवर्धनपुर १३, मुठेवाडगाव ४१, मातापूर ४२, खानापूर ११, आणि बेलापूर बुद्रुक ८३, खोकर २०, महांकाळवाडगाव २४, निपाणी वडगाव ३२, नायगाव २२, मांडवे १५, कुरणपूर १६, पढेगाव ६२, गोंडेगाव २६ अर्जासह कारेगाव ६४ असे एकुण ६८१ अर्ज तर कालपर्यंत ३२५ असे एकुण एक हजार हुन अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
संपादन : अशोक मुरुमकर