
खर्डा : सकाळी आठच्या सुमारास पायी फिरण्यासाठी गेलेल्या खर्डा येथील दोन महिलांना पीकअपने पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातात खर्डा येथील स्मिता दिलीप रणभोर (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला. वर्षा प्रकाश दिंडोरे या जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे.