Poonam Bhosale and Arya Bhosale
Poonam Bhosale and Arya Bhosalesakal

Akole News : मायलेकींचा प्रवरेत बुडून मृत्यू

प्रवरा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Published on
Summary

प्रवरा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

अकोले - म्हाळादेवी (ता. अकोले) येथे गुरुवारी दुपारी प्रवरा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

पूनम किरण भोसले (वय २७, रा. कोल्हार खुर्द), मुलगी आर्या किरण भोसले (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. पूनम भोसले या वडील नारायण महादू संगारे यांच्याकडे म्हाळादेवीला आल्या होत्या. दुपारी पूनम व मुलगी आर्या कपडे धुण्यासाठी स्मशानभूमीलगत असलेल्या धोबी घाटावर गेल्या होत्या. संगारे हे अकोले येथे आठवडे बाजारात गेले होते. ते दुपारी साडेतीन वाजता घरी आल्यानंतर लेक व नात घरात न दिसल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली.

या वेळी धोबी घाटावर त्यांना कपडे व चपला दिसल्याने, नातेवाईक व ग्रामस्थांनी परिसराची पाहणी केली. या वेळी पूनम यांचा मृतदेह आढळून आला. नातीचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता ती मिळून आली नाही. आज शुक्रवारी सकाळी आर्याचा मृतदेह पाण्यात आढळला. शविच्छेदन करून मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com