
राहुरी : जिल्ह्यात विविध ठिकाणी दुचाकी, गाड्यांचे टायर व हॉटेलमधील साहित्य चोरणाऱ्या महिला व मुलांच्या सराईत तीन जणांच्या टोळीला राहुरी पोलिसांनी जेरबंद केले. एका अल्पवयीन मुलाला बळजबरीने चोऱ्या करायला भाग पाडल्याचे समोर आले आहे. त्याची सुटका करून त्याला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून सव्वाचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींनी चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे.