राहुरी : राहुरी खुर्द येथील डिग्रस फाट्याजवळ नगर-मनमाड महामार्गावर एका भरधाव एसटी बसने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. युवराज कैलास भुजाडी (वय २१, रा. जोगेश्वरी आखाडा), असे मृताचे नाव आहे. .युवराज भुजाडी मागील तीन-चार महिन्यांपासून अहिल्यानगर येथील औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामास होता. तो सोमवारी सकाळी सात वाजता दुचाकीवरून कामावर चालला होता. डिग्रस फाट्याजवळ नगर-मनमाड रस्त्यावर एकेरी वाहतूक असलेल्या ठिकाणी त्याच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या एसटी बसची जोराची धडक बसली. अपघातात युवराज गंभीर जखमी झाला. त्याला अहिल्यानगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.