गोदावरी नदीवरील बांधाऱ्याची दारे टाकण्याच्या हालचाली सुरु

किरण नाईक
Monday, 21 September 2020

गोदावरी नदीवरील कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी साठविण्यासाठी दरवर्षी १५ सप्टेंबरपर्यत फळ्या टाकल्या जातात.

पुणतांबे (अहमदनगर) : गोदावरी नदीवरील कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी साठविण्यासाठी दरवर्षी १५ सप्टेंबरपर्यत फळ्या टाकल्या जातात. परंतु फार वर्षानंतर यावर्षी गोदावरी नदी फार काळ वहाती राहीली आहे. त्यामुळे फळ्या टाकण्याचे काम लांबणीवर पडले आहे. 

नुकतीच बंधारा कमेटीची बैठक ग्रामपंचायत सभागृहात पार पडली. फळ्या टाकण्यास कमेटी सदस्यांनी संमत्ती दिली आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साठविण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. 

गोदावरी नदीवरील हा सर्वात मोठा बंधारा आहे. या बंधाऱ्यातील पाण्याचा लाभ सुमारे चार हजार हेक्टर शेतीला होतो. दरवर्षी बंधारा कमेटी अध्यक्ष सुधाकर जाधव. यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हा बंधारा अडवित असतात. संजिवनी सहकारी साखर काऱखाना, कोळपेवाडी सहकारी साखर कारखाना व सोमयाँ केमीकल्स साखरवाडी आदींच्या अर्थीक मदतीने व शेतकऱ्यांच्या सहकार्याने या बंधाऱ्यात पाणी साठविले जाते. 

दरवर्षी सप्टेंबरमध्ये बंधारा पुर्ण क्षमतेने भरलेला असतो. परंतु यावर्षी ऋतुमान बदलामुळे गोदावरी नदी सप्टेंबरपर्यत वहाती आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साठविण्याची मागणी झाली नव्हती. बंधारा कमेटी सदस्य- सरपंच डॉ. धनंजय धनवटे, सुहास वहाडणे, रामकृष्ण डोखे, गणेश बनकर, भाऊसाहेब केरे, भुषण वाघ आदींनी एकत्र येऊन बंधाऱ्यात पाणी साठविण्याचा निर्णय घेतला आहे. बंधारा कमेटी मार्फत बंधारा आडविन्यासाठीच्या हलचाली सुरु झाल्या आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The movement to close the gates of the dam on the river Godavari started