
ग्रामीण भागात शिक्षण घेत असताना ऐवढी सुंदर कलाकृती आदेश करत आहे. तुला कुठलीही मदत लागल्यास निश्चित सांग, असे सांगत तिखोलमधील आदेशच्या रेखाचित्र कलेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कौतुक केले आहे.
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कुठलाही मोठ्या रकमेचा कोर्स न करता व कोणाचेही मार्गदर्शन न घेता ग्रामीण भागात शिक्षण घेत असताना ऐवढी सुंदर कलाकृती आदेश करत आहे. तुला कुठलीही मदत लागल्यास निश्चित सांग, असे सांगत तिखोलमधील आदेशच्या रेखाचित्र कलेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कौतुक केले आहे.
तिखोल (ता. पारनेर) येथील आदेश बाळासाहेब ठाणगे हा विद्यार्थी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे ढोकेश्वर महाविद्यालयात बारावी शिक्षण पुर्ण केले आहे.
आदेशला रेखाचित्र काढण्याची कला अवगत आहे. पुणे, मुंबईला कुठलाही कोर्स न लावता ही कला त्याने अवगत केली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे रेखाचित्र अगदी हुबेहुब काढुन आदेशने त्यांना पुणे येथे भेट दिले.
विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत त्यामधून व्यवसायिक संधी शोधावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याबाबत खासदार डॉ. कोल्हे यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर आदेश सोबतचे रेखाचित्र टाकत त्याच्या रेखाचित्र कलेचे कौतुक केले.
संपादन : अशोक मुरुमकर