Video: खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी चालविली तीन चाकी रिक्षा

गौरव साळुंके
Wednesday, 19 August 2020

तीन चाकी सरकार चालविण्यासाठी अतिशय काळजी घ्यावी लागते. मला माहित नाही.

श्रीरामपूर (अहमदनगर) : तीन चाकी सरकार चालविण्यासाठी अतिशय काळजी घ्यावी लागते. मला माहित नाही. राज्यातील तीन पक्षांचे सरकार किती दिवस टिकेल. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात हे राज्य सरकार अपयशी ठरले आहे. पाच मिनीटे तीन चाकी रिक्षा चालवून स्वतः अनुभव घेतला. अनेक गोष्टीवर लक्ष ठेवावे लागते. वेगावर नियंत्रण ठेवून सर्व पहावे लागते. तीन चाकी सरकारमध्ये बसलेले लोक घाबरलेले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या श्रीरामपूर येथील संपर्क कार्यालयात आज कोरोना तपासणी केंद्राचा शुभारंभ झाला. त्यासाठी विखे पाटील समर्थकांनी मागणी केली होती.
 

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते आज दुपारी येथे कोरोना तपासणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दिपक पटारे, केतन खोरे, संदीप चव्हाण, युवानेते शंतनू फोपसे उपस्थित होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी संपर्क कार्यालयापासुन मुळाप्रवरा वीज संस्थेच्या कार्यालयातपर्यंत तीन चाकी रिक्षा चालवून राज्यातील तीन पक्ष्याच्या सरकारवर टीका केली.
 

यावेळी सुजय विखे पाटील म्हणाले, तीन चाकी सरकार चालविण्यासाठी अतिशय काळजी घ्यावी लागते. मला माहित नाही राज्यातील तीन पक्ष्याचे सरकार किती दिवस टिकेल. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. पाच मिनीटे तीन चाकी रिक्षा चालवून मी स्वतः अनुभव घेतला. अनेक गोष्टीवर लक्ष ठेवावे लागते. वेगावर नियंत्रण ठेवून सर्व पहावे लागते.
 

तीन चाकी सरकार मध्ये बसलेले लोक घाबरलेले आहेत. त्यामुळे पाच हे सरकार स्थिर राहणे अवघड आहे. राज्य सरकारने दुध दर वाढीबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. पावसामुळे राज्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असुन अद्याप नुकसानीचे पंचनामे झालेले नाही. कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य नागरिक अतिशय कठीण परिस्थितीत वावरत असल्याचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Doctor Sujay Vikhe Patil drove a three wheeler riksha