esakal | "ते" म्हणाले, खासदारांना महापालिकेतील कळत नाही 
sakal

बोलून बातमी शोधा

sujay vikhe

भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे म्हणाले, ""खासदार डॉ. विखे पाटील हे वैद्यकीय क्षेत्रातील आहेत. त्यांना महापालिकेतील काही गोष्टींविषयी कळत नाही. त्यामुळेच डॉ. विखे पाटील व भाजप नगरसेवकांची दोन-तीन वेळा बैठक झाली. त्यात महापालिकेतील कामांची माहिती त्यांना देण्यात आली. त्यांनी महापालिकेतील समस्यांवर दीर्घ बैठकही घेतली.'' 

"ते" म्हणाले, खासदारांना महापालिकेतील कळत नाही 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : महापालिकेतील कामाची माहिती भाजप नगरसेवक देत नसल्याची खंत खासदार डॉ. सुजय विखे पाटील व्यक्त केली होती. त्यावर भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे म्हणाले, ""खासदार डॉ. विखे पाटील हे वैद्यकीय क्षेत्रातील आहेत. त्यांना महापालिकेतील काही गोष्टींविषयी कळत नाही. त्यामुळेच डॉ. विखे पाटील व भाजप नगरसेवकांची दोन-तीन वेळा बैठक झाली. त्यात महापालिकेतील कामांची माहिती त्यांना देण्यात आली. त्यांनी महापालिकेतील समस्यांवर दीर्घ बैठकही घेतली.'' 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्तीनिमित्त शहरात भाजपने कुटुंब संपर्क अभियान राबविले. त्याची माहिती देताना गंधे पत्रकारांशी बोलत होते. महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालण ढोणे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, मनोज कोतकर, पल्लवी जाधव, लता शेळके, अजय चितळे, पंकज जहागीरदार, वसंत राठोड, सतीश शिंदे आदी उपस्थित होते. 

गंधे म्हणाले, ""अनावधानाने भाजप नेते व कार्यकर्त्यांकडून महापालिकेत काही चुका झाल्या असतील; पण यापुढे सर्वांना बरोबर घेऊन काम करू. महापालिकेतील वकिलांच्या नियुक्‍त्या झाल्या असल्या, तरी अर्ज आल्यास आणखी वकिलांच्या नियुक्‍त्या करू.'' 
लॉकडाउनमध्ये डॉ. विखे पाटील, माजी खासदार दिलीप गांधी व भाजप नगरसेवकांनी शहरातील 30 ते 35 हजार कुटुंबांपर्यंत किराणा पोचविला. डॉ. विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात 75 हजार कुटुंबांना किराणा दिला. प्रवरा उद्योगसमूहाच्या माध्यमातून सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. शहरातील भाजप नेते व कार्यकर्त्यांनी 30 हजार कुटुंबांपर्यंत कुटुंब संपर्क अभियान पोचविले. त्यातून पंतप्रधान मोदी यांच्या कामांची माहिती दिली, असे गंधे यांनी सांगितले. 

रक्‍तपेढीच्या समस्येला बगल 
महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्‍तपेढीला दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी अत्याधुनिक यंत्रसामग्री दिली होती. मात्र, ही यंत्रसामग्री धूळ खात पडल्याचे सांगत महेंद्र गंधे व वसंत लोढा यांनी नाराजी व्यक्‍त केली होती. या रक्‍तपेढीच्या प्रश्‍नाला महेंद्र गंधे यांनी बगल दिली.