
पारनेर : राज्यात सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कांदा व फळबांगासह इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.