esakal | राज्यात लसीकरणाचा सावळा गोंधळ : डॉ. सुजय विखे पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

MP Sujay Vikhe Patil

राज्यात लसीकरणाचा सावळा गोंधळ : डॉ. सुजय विखे पाटील

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (जि. नगर) : ‘‘खासदारपदावर काम सुरू केल्यापासून कुठलाही निधी आणण्यात अडचण आली नाही. शहरासाठी महत्त्वाचे असणारे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. विकासकामांसाठी मंत्रिपदाची आवश्यकता नाही. भाजपमध्ये सर्वांना सारखा न्याय दिला जातो,’’ असे सूचक वक्तव्य खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नूतन केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केले आहे. (MP-sujay-vikhe-said-about-corona-vaccination-ahmednagar-political-news)

मी पुढाकार घेईन तेव्हा वितरण कसे सुरळीत होते पाहा

पारनेर तालुक्यातील रस्त्यांच्या उद्‍घाटनासाठी आले असताना ते ‘सकाळ’शी बोलत होते.
जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccination) धोरणाबाबत विचारले असता, त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, की आधी कोणती लस खरेदी करायची, याच्या टेंडरमध्येच त्यांना रस होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या हिताचा निर्णय घेत ती मोफत उपलब्ध करून दिली. तेही त्यांना सहन होत नाही. सर्वच ठिकाणी लसीकरण वितरणाबाबत सावळा गोंधळ सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांत हा सर्व प्रकार नित्याचाच बनला आहे. जिल्ह्यात लसींच्या वितरणाबाबत मी खासदार म्हणून पुढाकार घेईन. तसे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत. त्यापुढे हे वितरण कसे सुरळीत होते ते पाहा.

हेही वाचा: राज्यातील साखर कारखाने केंद्रामुळेच वाचले - चंद्रकांत पाटील

तीन पक्षांची महाविकास आघाडी तालुक्यात दिसत नाही

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, की अजून दुसरी लाटच आटोक्यात आली नसल्याने, तिसरी येईल कुठून? अजूनही मोठमोठे लग्नसमारंभ होत आहेत. त्यास आपणही जबाबदार आहोत. मात्र सरकारी यंत्रणाही त्यास कारणीभूत ठरली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांबाबत पारनेर तालुक्यात कोणता पक्ष सोबत घेणार, असे विचारले असता ते म्हणाले, की या निवडणुकांबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही. तालुक्यातील आमच्या विचाराचे जिल्हा परिषद सदस्य, माजी सदस्य, पक्षाचे पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार आहेत. कारण, राज्यातील तीन पक्षांची महाविकास आघाडी तालुक्यात दिसत नाही. यातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव जाणवतो.
ऑनलाइन अभ्यासक्रमास (Online Education) विद्यार्थ्यांना इंटरनेटसाठी रेंजच्या येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने गावनिहाय सर्वेक्षण करून विविध टेलिकॉम कंपन्यांशी संपर्क करणार आहोत.

हेही वाचा: बारमालकानी केली वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा; पाहा व्हिडिओ

काँग्रेस उरली फ्लेक्स लावण्यापुरती

विखे कुटुंब काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेस नावापुरतीच उरली आहे. नेत्यांचे
वाढदिवस व त्यांचे फ्लेक्स लावण्यापुरतीच संघटना शिल्लक राहिली आहे. पदाधिकाऱ्यांना आता फलक लावण्याचीच कामे शिल्लक राहिली आहेत.

(MP-sujay-vikhe-said-about-corona-vaccination-ahmednagar-political-news)

loading image