फक्त माझ्यावरच नाही तर आरोग्यमंत्र्यांवरही गुन्हा दाखल करा

MP Sujay Vikhe says file a case not only against me but also against the Health Minister
MP Sujay Vikhe says file a case not only against me but also against the Health Minister

अहमदनगर : नगर, पारनेर, राहुरी तालुक्यातील गावांमध्ये के. के. रेंज प्रकरणी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे शेतकऱ्यांबरोबर बैठका घेत आहेत. आता त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. बैठकीला उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसुन अनेकजण तोंडाला मास्कही वापरत नसल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान यावर बोलताना डॉ. विखे यांनी माझ्या एकट्यावरच नव्हे तर आरोग्यमंत्री रोश टोपे यांच्यासह ३०० लोकांवरही गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे.

भाजपचे खासदार डॉ. विखे म्हणाले, कोरोना रोखण्यासाठी मी जिल्ह्यात फिरत आहे. काही ठिकाणी बैठका घेतल्या. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. माझ्या एकट्यावरच नव्हे तर पारनेरमध्ये आरोग्यमंत्री टोपे यांनी कोविड सेंटरचं उद्घाटन केलं होते. त्यावेळी उपस्थित असलेल्यांवरही गुन्हे दाखल करा. एकट्या खासदाराला टार्गेट करण्यात काय अर्थ आहे?, असा सवालही त्यांनी केला.

डॉ. विखे यांनी के. के. रेंज संदर्भात घेतलेल्या बैठकीला उपस्थित असलेल्या अनेकांनी मास्क लावले नसल्याचेही फोटोमध्ये दिसत आहे. या बैठकीचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले. आहेत. त्यानंतर विखे यांच्यावर टीका सुरू झाली.

डॉ. विखे म्हणाले, मी लॉकडाऊन लावा, असे म्हणत होतो तेव्हा तो लावला नाही. त्यामुळे मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली. माझ्या जिल्हाबंदीची मागणी काहीजणांनी केली. पण त्यांना माझे फोटो दिसत असतील, तर त्यांनी या जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांचे फोटो देखील पहावे. ते भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम घेताना माझ्यापेक्षा दुप्पट गर्दी करीत आहेत. परंतु दुर्देवाने सत्तेच्या विरोधात बोलण्याची कुणाची हिंमत होत नाही.

मी जनतेच्या कामासाठी फिरतोय. माझ्यावर गुन्हा दाखल करायचा आहे, तर मी पूर्णपणे तयार आहे. मात्र फक्त माझ्या एकट्यावर हा गुन्हा झाला नाही पाहिजे. आमदर रोहित पवार यांचे नाव न घेता कर्जत- जामखेडमध्ये तर रोज भूमिपूजन होतात. त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मी तर के. के. रेंज प्रश्नासाठी बाहेर पडलो आणि हा प्रश्‍न तीव्र करणार मी नव्हतो. तर हा प्रश्‍न तीव्र करणारे पारनेरला ज्यांनी आंदोलन केले ते होते. या आंदोलनानंतर खरतर मला जनतेमध्ये जावे लागले. अन्यथा कोरोना थांबण्याची वाट मी पाहू शकलो असतो, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com