कलेक्टरसाहेब खासदार नाही डॉक्टर म्हणून सांगतोय, नगर लॉकडाउन करा; नाही तर...

MP Vikhe Patil says, lock down Nagar district
MP Vikhe Patil says, lock down Nagar district
Updated on

नगर : ""कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाने सावध भूमिका घेत, कमीत-कमी पाच दिवस "जनता कर्फ्यू' लावावा. हे एक खासदार म्हणून नव्हे, तर डॉक्‍टर म्हणून मत व्यक्त करीत आहे. वेळीच लॉकडाउन केले नाही, तर कोरोनाची परिस्थिती अधिक धोकादायक होईल. त्यास सर्वस्वी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हेच जबाबदार असतील,'' असे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. 

पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, ""जिल्हा रुग्णालयातील टेस्टिंग लॅबमध्ये एक हजार अहवाल पेंडिंग राहतात. महापालिका क्षेत्रात व ग्रामीण भागात रोज 200 रुग्ण आढळत आहेत. दहा दिवसांपूर्वी स्वॅब घेऊनही नागरिकांना अहवाल मिळत नाहीत. त्यामुळे नागरिक अक्षरशः रडकुंडीला आले आहेत.

विळद घाटातील लॅबमध्ये आजअखेर 429 जणांची तपासणी केली, त्यांत तब्बल 137 पॉझिटिव्ह आढळले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त तपासणीची गरज आहे. तसेच, 24 तासांत अहवाल यायला हवा.

जिल्हा रुग्णालयातून अहवालास उशीर होत असल्याने, कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्‍यता आहे.'' 
जिल्हा रुग्णालयाला खासदार निधीतून 12 रुग्णवाहिका देणार असल्याचे डॉ. विखे पाटील म्हणाले. आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन आदी उपस्थित होते. 
 
संग्रामभैया म्हणतात...
आमदार जगताप म्हणाले, ""लॉकडाउनबाबत प्रशासनाकडून प्रस्ताव आला पाहिजे. प्रशासन प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आहे. परिस्थितीनुसार लॉकडाउनसंदर्भात प्रशासन योग्य वेळी विचार करील.'' 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Karjat Sets an Example of Humanity as Volunteers Stand by Their Sick Companion
Parents Trust the School, Infrastructure Fails the Students in Akole
Compassion in Action: Hingani Dumala Villagers Support Family After Tragic Loss
Anna Hazare’s Protest Averted as Maharashtra Govt Stays New RTI Rules
Marathi News Esakal
www.esakal.com