रूपयाचा भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झालं तर खासदारकीचा राजनामा देईन, विखे पाटलांचे चॅलेंज

विलास कुलकर्णी
Tuesday, 27 October 2020

"कारखाना तिनदा विक्रीला काढला. भंगारात सुद्धा किंमत नव्हती. आधुनिकीकरण करुन, मशिनरी सोन्यासारखी केली. तीन हजार टनी कारखाना चार हजार दोनशे टनी केला. उद्यापासून ऊस तोडणी सुरू होईल.

राहुरी : "तनपुरे साखर कारखान्याची मिल, भंगार, जमिनविक्री केली. परंतु, त्याचे पैसे कामगारांना वेतनासाठी दिले. एक रुपया भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध केले. तर, खासदारकीचा राजीनामा देईल. यंदा सहा लाख टन ऊसाचे गाळप करु.

दीड महिन्यात आसवणी प्रकल्प कार्यान्वीत करुन, 50 लाख लिटरचे उत्पादन घेऊ. जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा व ऊसदर मिळेल. याची खात्री बाळगा. मी माझी जबाबदारी पार पाडली. आता, ऊस देऊन सभासदांनी जबाबदारी पार पाडावी." असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी केले.

आज (मंगळवारी) डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा सन 2020-21 हंगामाचा बॉयलर प्रदीपन व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून, गळीताचा शुभारंभप्रसंगी खासदार डॉ. विखे-पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी रावसाहेब साबळे होते. महंत उद्धव महाराज मंडलिक, माजी आमदार शिवाजी कर्डिले, अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, संचालक श्यामराव निमसे, सुरेश करपे, तान्हाजी धसाळ, अमोल भनगडे, साहेबराव म्हसे, उत्तम म्हसे, चाचा तनपुरे, शिवाजी सोनवणे, ज्ञानदेव आहेर उपस्थित होते.  

खासदार डॉ. विखे-पाटील म्हणाले, "परिवर्तन मंडळाच्या माध्यमातून कारखान्याची निवडणूक लढविली. सभासद, कामगारांनी विश्वास टाकला. जिल्हा बँकेत माजी आमदार कर्डिले यांनी मदत केली. त्यामुळे, कारखाना सुरळीत चालविता आला. ज्यांनी परिवर्तन मंडळाच्या काळात एक टिपरु ऊस कारखान्याला दिला नाही. कारखान्यातून घेतलेले जुने ॲडव्हान्स भरले नाहीत. त्यांना कारखान्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. आसवणी प्रकल्प भाडेतत्वार देण्याचा प्रयत्न करु. शक्य झाले नाही. तर, देशी दारुचे लायसेन्स विकू. दीड महिन्यात आसवणी सुरु करु."

"कारखाना तिनदा विक्रीला काढला. भंगारात सुद्धा किंमत नव्हती. आधुनिकीकरण करुन, मशिनरी सोन्यासारखी केली. तीन हजार टनी कारखाना चार हजार दोनशे टनी केला. उद्यापासून ऊस तोडणी सुरू होईल.

मागील निवडणुकीत जेवढे सभासद होते. तेवढेच राहतील. कब्जा करण्यासाठी मतदार यादीतून नावे कमी करणार नाही. कै. बाळासाहेब विखे-पाटील यांच्यासारखे माझे जीवन शेतकरी, कामगारांना समर्पित राहील. परिवर्तन मंडळाच्या काळातील कामगारांची थकबाकी जानेवारी महिन्यापासून देण्यास सुरुवात करु. राज्य सरकार लोकतांत्रिक नाही. षडयंत्री सरकार आहे." असेही खासदार डॉ. विखे-पाटील यांनी सांगितले.

तनपुरे उतारवयात आंदोलन करायला निघालेत

माजी आमदार कर्डिले म्हणाले, "मागील पाच वर्षात मी केली तेवढी कामे तनपुरे यांनी करून दाखवली. तरी, पाठ थोपटील. परंतु, ऊर्जा राज्यमंत्री केवळ रोहित्रांच्या उद्घाटनांवर समाधानी आहेत. त्यांचे वडील उतारवयात एसटी डेपो व नगर-मनमाड महामार्गासाठी आंदोलनाचे इशारे देत आहेत. केंद्र सरकारकडे बोट दाखवीत आहेत. महामार्गाच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारनेच 450 कोटी रुपये मंजूर केले." बाबासाहेब देशमुख यांनी आभार मानले. 

संपादन -अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Vikhe's challenge to the opposition