पुण्यातील गावांना मिळणारी पारनेरची वीज तोडणार; ठिय्या आंदोलनाचा दणका

MSEDCL Deputy Engineer Prashant Adbhai assures that power supply will be provided at full capacity in Parner taluka in future.jpg
MSEDCL Deputy Engineer Prashant Adbhai assures that power supply will be provided at full capacity in Parner taluka in future.jpg
Updated on

पारनेर (अहमदनगर) : पारनेरच्या वीज उपकेंद्रातून पुणे जिल्ह्यातील काही गावांना देण्यात येणारी वीज या पुढील काळात दिली जाणार नाही. तसेच तालुक्यात  कमी दाबाने होणारा वीजपुरवठा लवकरच कपॅसिटर बसवून सुरळीत केला जाईल. यापुढील काळात तालुकाभर पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा केला जाईल, असे आश्वासन महावितरणचे उपअभियंता प्रशांत आडभाई यांनी दिले.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शुक्रवारी (ता. 12 ) तालुक्यातील निवडक कार्यकर्त्यांसह उपअभियंता आडभाई यांची भेट घेऊन त्यांच्याशी तालुक्यात कमी दाबाने व वारंवार खंडीत होणा-या वीज पुरवठ्याच्या प्रश्नासंदर्भातील भेट घेतली. त्यावेळी वीजेच्या संदर्भातील  विविध मागण्यांचे निवेदन आडभाई यांना देण्यात आले.
 
तालुक्यातील अनेक गावांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नाही. ज्या शेतकऱ्यांनी विजेची थकबाकी भरली त्यांचे वीज कनेक्शन तोडू नये, अशीही मागणी केली. पारनेरला कमी दाबाने वीज पुरवठा होत असतानाही तुम्ही पारनेरची वीज पुणे जिल्ह्याला कशी काय देता यावर झावरे संतापले. या पुढील काळात पारनेरची वीज पुण्याला दिल्याचे खपवून घेतले जाणार नाही. तसे घडल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असेही झावरे पाटील यांनी सांगितले.
     
यावर तालुक्यातून पुणे जिल्ह्याला होणारा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे, यापुढे पारनेरची वीज पुण्याला दिली जाणार नाही. तसेच थकबाकी भरणा-या शेतकऱ्यांचे वीज जोड तोडणार नसल्याचे आश्वासन आडभाई यांनी दिले. यावेळी खंडू भुकन, अॅड. बाबासाहेब खिलारी, सोन्याबापू भापकर, अमोल साळवे, दिपक नाईक, किसनराव धुमाळ, लहू भालेकर, योगेश मते, सतीश पिंपरकर, सुहास पुजारी यांच्यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी शेतकऱ्यांची वीज तोडू नये अशी  भूमिका घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांचे वीज जोड तोडले जाणार नसल्याचे आश्वासन दिले. मात्र अधिवेशन समाप्तीच्या दिवशी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज कनेक्शन तोडणार असल्याचे सांगितले. एका सरकारच्या या दोन भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 
- सुजीत झावरे पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com