esakal | महावितरणचा अभियंता लाचेच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar

महावितरणचा अभियंता लाचेच्या जाळ्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : लिंपणगाव (ता. श्रीगोंदे) ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल थकल्याचे कारण देत वीजजोड तोडला गेला. मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पदाधिकारी अधिकाऱ्यांकडे विनवणी करीत होते. मात्र त्यासाठी वीस हजार द्या, अशी सतत मागणी करणाऱ्या महावितरणचा कनिष्ठ अभियंता पांडू पुनाजी मावळी याला १५ हजाराची लाच घेताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिधीक्षक हरिष खेडकर यांच्या पथकाने रंगेहात पकडले.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लिंपणगाव ग्रामपंचायतीचे विद्युत बिल थकलेले होते. महावितरणकडून ग्रामपंचायतीचा वीज जोड तोडला होता. विद्युत जोड तोडले. मुळे गावाचा पाणीपुरवठा बंद होत असल्याने तक्रारदारांनी यातील आरोपी लोकसेवक मावळी यांची भेट घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करुन देण्याबाबत विनंती केली. त्यावेळी मावळी याने हा वीजजोड जोडण्यासाठी वीस हजाराची मागणी केली.

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीवरून आज केलेल्या लाच मागणी पडताळणीत आरोपी मावळी याने लाचेची मागणी पंचासमक्ष करून ही लाच रक्कम १५ हजार रुपये लिंपणगाव येथील एका हाॅटेलात घेतले. सापळा कारवाई करीत मावळी याला रंगेहाथ पकडण्यात आले.

loading image
go to top