esakal | एमएसपी, एफआरपीचा मेळ जुळेना, लाखो टन साखर गोदामातच

बोलून बातमी शोधा

MSP, FRP do not match, millions of tons of sugar in the warehouse

साखरेची किमान आधारभूत किंमत ३१०० रुपयांपर्यंत असून कारखान्यांची एफआरपी त्यापेक्षा जास्त आहे.

एमएसपी, एफआरपीचा मेळ जुळेना, लाखो टन साखर गोदामातच
sakal_logo
By
सचिन गुरव

सिद्धटेक : चालू गळीत हंगाम साखर कारखान्यांसह शेतकऱ्यांनाही खूपच अडचणींचा गेला. ऊस वाहतूक, गाळपक्षमता, ऊसतोडणी वेळापत्रक या समस्यांबरोबरच आता 'एफआरपी'देखील कारखान्यांना अडचणीची ठरत आहे.

कारण 'एफआरपी'ही साखरेच्या किमान आधारभूत किमती(एमएसपी)पेक्षा जास्त आहे. परिणामी विक्रीअभावी साखर गोदामातच पडून आहे. त्यामुळे शेतकरी खूष असले तरी एफआरपीवरुन साखर कारखान्यांपुढील अडचणी मात्र वाढल्या आहेत.

साखरेची किमान आधारभूत किंमत ३१०० रुपयांपर्यंत असून कारखान्यांची एफआरपी त्यापेक्षा जास्त आहे. या हंगामात आजअखेर जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांनी १०१.३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून १४७.२९ लाख टन साखरेची निर्मिती केली आहे.

यावर्षी साखरेचे दर ३४ रुपये पर्यंत होते. त्यावेळी कारखान्यांना उसाचा दर देण्यात कोणतीही अडचण वाटत नव्हती.परंतु सध्या साखरेचे दर ३१ रुपयांवर आले आहेत.त्यातच साखर उत्पादन खर्च,घेतलेले कर्ज,त्यावरील व्याज,कामगारांचा पगार, देखभाल व दुरुस्तीचा खर्च, अन्य खर्चाचा ताळमेळ या ताळेबंदाचा समतोलही कारखान्यांना ठेवावा लागत आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे कारखान्यांना ऐनवेळी हार्वेस्टरचाही वापर करावा लागला होता.त्यामुळे वाहतूक यंत्रणाही कोलमडली होती. दरम्यान, तोटा टाळण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची देणी भागवण्यासाठी कारखान्यांनी केंद्र सरकारकडे साखरेची 'एमएसपी'वाढवण्याची मागणी केली आहे.
शिल्लक साखरेची स्थिती-
कारखाना         शिल्लकसाखर(मेट्रिक टन)

अंबालिका            १,२४,५०६
ज्ञानेश्वर              ९३,३८०
मुळा                ८४,३०१
संगमनेर              ८२,३४४
संजीवनी              ६२,८०८
कुकडी               ६१,५८०
श्रीगोंदा               ६१,०९७
प्रसाद                ५४,२३०
प्रवरा                ५१,६८८
श्री.वृद्धेश्वर             ४०,४२२
गंगामाई               २४,४४२